महिलांनो उद्योग उभारा ! मी तुमच्या पाठीशी आहे - सुनेत्रा पवार
महिला सर्व क्षेत्रात काम करत आहेत. त्यासोबतच महिलांनी आता पुढे येऊन लघुउद्योग उभारण्यावर भर दिला पाहिजे असं मत सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलं. देहू येथे वॉटर ATM योजनेचे भूमिपूजन बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सौ. सुनेत्रा पवार यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी महिलांसाठी मंगळागौर खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत तुकाराम मंगल कार्यालय देहू येथे महिलांशी सुनेत्रा पवार यांनी संवाद साधला.
पुढे बोलताना म्हणाल्या की, आदरणीय शरद पवार साहेबांनी महिला धोरण आखून व महिलांना आरक्षण देऊन महिलांना राजकारणात मोठी संधी दिली आहे. पण महिलांनी आता राजकारणासोबतच उद्योग-व्यवसायातही उतरले पाहिजे. ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येऊन बचतगट स्थापन करावेत. बचत गट ही आजच्या काळाची गरज आहे. सर्वांनीच नोकरीची अपेक्षा न ठेवता स्वतःचे उद्योग सुरू करावेत. बचत गटामार्फत महिलांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करून त्यांचा कौशल्य विकास करावा. बचत गटाच्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. अशाप्रकारे तुम्ही बचतगटाच्या माध्यमातून उद्योग सुरू करा, मी तुम्हाला सर्वोतोपरी मदत करीन. स्त्रियांनी आता स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. बारामतीमध्ये याच सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही 'बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क'ची स्थापना केली आहे, असं त्या म्हणाल्या. हे सर्व करत असताना आपण पर्यावरणाचेही भान राखले पाहिजे अशी आठवण त्यांनी करून दिली.
दि.09 ऑगस्ट 2017 रोजी
श्रावण मासानिमित्त महिलांसाठी मंगळागैरी कार्यक्रम व या सोबतच वॉटर ए.टी.एम योजना व R.O फिल्टर प्लँन्ट भुमिपुजन कार्यक्रमाचे आयोजन श्रीक्षेत्र देहु येथील पंचायत समिती सदस्या सौ.हेमलता काळोखे आणि राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पार्टी,देहु यांच्या वतीने
करण्यात आले होते.