महिला दिन
बारामतीतील विविध महिला मंडळांच्या वतीनं आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त 'ती' चा जागर या कार्यक्रमास उपस्थित राहिले.. यावेळी महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तर लीना धारपुरे यांनी महिलांसाठी होम मिनिस्टर हा विविध खेळांचा समावेश असलेला स्पर्धात्मक कार्यक्रम सादर केला. महिलांचा विविध क्षेत्रातील सहभाग वाढत असताना बारामतीत विविध महिला मंडळांनी एकत्र येत आयोजित केलेल्या एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात सहभागी होवून महिलांशी संवाद साधता आल्याचं समाधान वाटतं..