शिवजयंती उत्सव
बारामती शहरातील देसाई इस्टेट शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आज छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहून छत्रपती शिवरायांना वंदन केले.. याचवेळी समाज प्रबोधनकार आशिषमहाराज काटे यांचा गौरवही केला. छत्रपती शिवरायांनी नेहमीच समाज सुधारणेला महत्व दिले. या पार्श्वभूमीवर आयोजित किर्तनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच समाजात जागृती होईल असा विश्वास वाटतो..