जीवनसाधना गौरव पुरस्कार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वर्धापनदिन सोहळा काल पार पडला. या सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते जीवनसाधना गौरव पुरस्कार मला प्रदान करण्यात आला. गेली अनेक वर्षे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल या निमित्तानं घेतली गेली याचं समाधान वाटतं.. या पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली आहे याची जाण ठेवून पुढे कार्यरत राहू ही ग्वाही देते..