जन्मोत्सव कार्यक्रम
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे स्वराज्यजननी जिजाऊ मॉंसाहेब आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सव कार्यक्रमात सहभागी होत त्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण केलं.. यावेळी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.. महाराष्ट्राला थोर मातांचा वारसा लाभला आहे.. हा वारसा पुढे नेण्याचं काम विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला करताहेत ही समाधानाची बाब आहे. कुटुंबांचा आधार असलेल्या महिलांबद्दल नेहमीच कृतज्ञ राहिलं पाहिजे असं आवाहन यावेळी केलं..