स्नेहसंमेलन
आज विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर शाळेच्या स्नेहसंमेलनास उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आनंद घेतला.. लहानपणापासून मुलांमधील कलागुणांना वाव मिळाला तर ते निश्चितच यशाची शिखरे पादाक्रांत करु शकतात.. केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दलही अधिकची माहिती मिळावी यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत.. तसेच विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज शिक्षणाच्या अनेक सुविधा उपलब्ध झाल्या असून त्या माध्यमातून अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उज्वल कामगिरी करत आहेत. येणाऱ्या काळात बारामती हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे नवे केंद्र म्हणून पुढे येणार आहे.. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरातून जीवन अधिक सुखकर करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न होणार असून या नविन शिक्षण पद्धतीचाही आपण लाभ घ्यावा असं आवाहनही यावेळी केलं..