50 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन .
वैज्ञानिकांच्या संशोधक वृत्तीचे दर्शन, सुप्यातील 50 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन .
(4 जानेवारी 2023)
आज बारामती तालुक्यातील सुपे येथील 50 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केले . सोबतच विद्या प्रतिष्ठानच्या सुपे कॅम्पसने आयोजित केलेल्या सुपे परगणा खाद्य महोत्सवाचे व कलादालनाचे उद्घाटन केले.
बाल वैज्ञानिकांमध्ये असणारी संशोधनाची जिज्ञासा या वेळी दिसून आली. तालुक्याच्या ग्रामीण भागातून एकापेक्षा एक सरस वैज्ञानिक प्रकल्प घेऊन दाखल झालेले बाल वैज्ञानिक ज्या आत्मविश्वासाने आपले प्रकल्प सादर करीत होते त्यातून उद्याच्या भारतातील संशोधकांची एक छबी जाणवत होती.
त्याचबरोबर सुपे सारख्या ग्रामीण भागातील लोकांनी एकत्र येत परगणा खाद्य महोत्सव अर्थात खाऊगल्ली यशस्वी केली . ग्रामीण भागातील अस्सल गावरान पदार्थांचे स्टॉल्स व त्याला प्रतिसाद देणारे खवय्ये यामुळेच ग्रामीण भागातील अनेकांना हा आगळावेगळा अनुभव होता .याबरोबर ज्या लोकांना आपण रिसायकल होणाऱ्या वस्तू दिल्या व त्यातून कलाविष्कार साधत त्यातून या लोकांनी निर्माण केलेले कलादालन पाहून समाधान वाटले .
आजच्या दिवसभरात बालवैज्ञानिकांचे विज्ञान, खवय्यांची खाऊगल्ली ते कलांचे कलादालन ते ग्रंथ दिंडी अशा संपूर्ण सोहळ्याचे उद्घाटन केल्याचा मनस्वी आनंद होत आहे .