बारामती गणेश फेस्टिव्हल
बारामती गणेश फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध किर्तनकार निवृत्तीमहाराज देशमुख यांच्या किर्तनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून निवृत्तीमहाराजांचे स्वागत केले. बारामती गणेश फेस्टिव्हलच्या माध्यमातून बारामतीकरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांसह समाज प्रबोधनपर कार्यक्रमांचेही आयोजन केले जात आहे. बारामतीकरही यामध्ये उस्त्फुर्तपणे सहभाग घेत आहेत ही कौतुकास्पद बाब आहे.