वनसप्ताह
आज दि.३ जुलै २०१७ रोजी महाराष्ट्र शासन वन विभागाच्या वतीने वनसप्ताह निमित्त २०१७ च्या पावसाळ्यामध्ये ४ कोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत नारोळी वनक्षेत्रात महाराष्ट्र शासन वन विभाग, एन्व्हॉर्यमेंन्टल फोरम ऑफ इंडिया बारामती व नारोळी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण मोहिम एन्व्हॉयर्यमेंन्टल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या शुभहास्ते नारोळी फॉरेस्टमध्ये घेण्यात आली.
या प्रसंगी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.शिवाजी राऊत ,जिल्हा परिषद सदस्य श्री.भरत खैरे, बारामतीच्या नगराध्यक्षा सौ.पोर्णिमा तावरे, नारोळीच्या सरपंच सौ.सिमा ढमे,उपसरपंच श्री.तानाजी भंडलकर ,रा.कॉ.युवक पुणे जि.उपाध्यक्ष श्री.गोरख चांदगुडे, बारामती तालुका युवक अध्यक्ष श्री.राहुल वाबळे, माजी.जि.परीषद सदस्य श्री.बापुराव चांदगुडे, मार्केट कमिटि माजी सभापती श्री.संजय पोमण,श्री.संदिप काटे, श्री.किरण कोंडे, श्री.धनंजय गवळी, श्री.शांताराम चांदगुडे, बारामती वन विभागातील वनपाल श्री.पी.जे.जराड, श्री.व्ही.बी.देवकर, श्री.पी.एस.खोमणे,सातपुते,वनरक्षक श्री.टी.आर. पिचड, श्री.आर.डी.इंगवले,श्री.गणेश सरोदे या सह नारोळी गावचे ग्रामस्त आणि फोरम सदस्य मोठ्या सख्येनी उपस्थित होते.