भारतीय हॉलीबॉल संघातील सदस्यांचा आज सत्कार केला
दुबईमध्ये सलग दहा वर्ष अंतिम सामना जिंकणाऱ्या कॅनडाचा उपांत्य फेरीत पराभव करत बलाढ्य असलेल्या टांझानियाला अंतिम सामन्यात आस्मान दाखवणाऱ्या भारतीय हॉलीबॉल संघातील सदस्यांचा आज सत्कार केला. भारतीय क्रिडा क्षेत्रात उज्वल कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा अभिमान वाटतो. हॉलीबॉलमध्ये भारतीय संघाने केलेली कामगिरी निश्चितच नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारी आहे.
या सत्कार प्रसंगी संघाचे प्रशिक्षक शरद कदम, उपकर्णधार अंकुश पाठक, फुलचंद वाघ, धैर्यशील दळवी, काटेवाडी गावचे माजी उपसरपंच धिरज घुल डायरेक्ट हॉलीबॉल असोसिएशनचे संचालक धीरज घुले उपस्थित होते.