शैक्षणिक व सामाजिक कामगिरि बद्दल सम्मान
भारतीय स्त्रीशिक्षणाच्या जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 189 व्या जयंती व विद्यार्थिनींच्या हिमोग्लोबिन तपासणी शिबिराच्या निमित्ताने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.नितीन करमळकर यांच्या शुभहस्ते मा.सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांना सन्मानित करण्यात आले,याच बरोबर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर सन्माननीय माई ढोरे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई नडेल व शितल वैद्य,यांना ही सन्मानित करण्यात आले.
सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा वसा घेऊन पुढील काळात आपण ही सर्वांनी मिळून त्यांचे कार्य अविरत सुरू ठेऊ असे प्रतिपादन सौ.सुनेत्रावहिनी पवार यांनी केले.
या निमित्ताने व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे,अधिसभा सदस्य श्रीमती भाग्यश्री मंठाळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विलास उगले,डॉ.संजय चाकणे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.संतोष परचुरे,त्याचप्रमाणे विद्यार्थी मोठ्या संख्येने
उपस्थित होते...