पर्यावरण चक्र व शास्त्र यांच्याशी एकरूप जीवन पध्दतीच माणसाला तारेल
विद्या प्रतिष्ठान सुपे शैक्षणिक संकुल वर्धेपन दिन व जागतिक वनसप्ताह या निमित्ताने मौजे सुपे दंडवाडी हद्दीत छप्पन मिरी चा महादेवाचा डोंगर महादेव मंदिर परिसरात विद्या प्रतिष्ठान आर्टस ,कॉमर्स सायन्स कॉलेज ,सुपे , इंग्लिश मिडियम स्कूल मधील विद्यार्थी, शिक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थी - विद्यार्थीनी आणि एन्व्हॉर्यमेंटल फोरम इंडिया बारामती चे सदस्यां बरोबरच दंडवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामस्तांच्या सहभागातुन या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
तब्बल 200 वृक्षांची लागवड या डोंगरावर करण्यात आली आहे. तसेच नुकताच शालेय जीवनात प्रवेश घेणा-या मुलांचे स्वागत गुलाबपुष्पे व खाऊ देवून करण्यात आले.
याप्रसंगी एन्व्हॉर्यमेंन्टल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रा वहिनी पवार, विद्या प्रतिष्ठान संस्थेचे सचिव द.रा. ऊंडे, विश्वस्त ऑड.निलीमा गुजर , श्रीकांत सिकची, जिल्हा परिषद सदस्य श्री.भरत खैरे, पंचायत समिती सदस्या सौ.नीता ताई बारवकर, सरपंच सौ.प्रगतीताई नगरे , प्राचार्य मा. भरत शिंदे, प्राचार्य योगेश पाटील, राहुल पाटील या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुक्या पशू- पक्षी व निसर्गातील घटकांसाठी काम केल्यास तसेच आपल्या आजूबाजूला दररोज दिसणारे पक्षी व प्राणी यांच्या जतनासाठी आपण स्वत पुढे सरसावले पाहिजे या हेतूनेच या उपक्रमाचे आयोजन करण्याचा सर्वांचा उपक्रम स्तुत्यच आहे असे मत मा. सुनेत्रा ताई पवार यांनी व्यक्त केले.