उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे
कोणत्याही गावाच्या सर्वांगिण विकासामध्ये खेळाला महत्वाचे स्थान आहे. गावातील खेळाडू किती स्पर्धा गाजवत आहेत ही बाब गावाच्या दृष्टीने नेहमीच अभिमानास्पद असते. म्हणूनच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे अंतर्गत तालुका क्रिडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा संकुल समिती यांच्या वतीने बारामती तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शालेय खेळाडूंसाठी शासकीय उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन काल (दि. १५) केलं.
या प्रसंगी पोलीस उपअधीक्षक श्री. बापूसाहेब बांगर, तहसिलदार श्री. हनुमंत पाटील, नगराध्यक्षा सौ. पोर्णिमा तावरे, बारामती शहर रा. कॉ. अध्यक्ष श्री. इमत्तियाज शिकिलकर, बारामती बँकेचे उपाध्यक्ष श्री. अविनाश लगड, तालुका क्रीडा अधिकारी राजेश बागुल, दादा आव्हाड, तसेच पालक व खेळाडू उपस्थित होते.
या प्रशिक्षण शिबीरात सहभागी सर्व खेळाडू शिबिराचा लाभ घेत आपल्या अंगी असलेले क्रीडाकौशल्य अधिकाधिक विकसीत करण्याचा प्रयत्न करतील याची खात्री आहे.