Republic day 2018
आज विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे ध्वजारोहण केलं. यावेळी उत्साहपूर्ण वातावरणात एनसीसी आणि इतर विद्यार्थ्यांनी यावेळी अगदी शिस्तबद्ध पथसंचालन केलं. विद्यार्थ्यांच्या अनेक तुकड्यांनी कवायती सादर केल्या. देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य सादर केले. या नयनरम्य कार्यक्रमाची काही क्षणचित्रे.
या प्रसंगी विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अँड. ए. व्ही. प्रभुणे, सचिव द. रा. उंडे, खजिनदार रमणिक मोता, संस्थेचे विश्वस्त अँड. नीलीमा गुजर, संस्थेचे रजिस्ट्रार कर्नल कंभोज सर, विद्या प्रतिष्ठानमधील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.