स्वच्छ सर्वेक्षण २०१८
केंद्र शासन गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय आयोजित 'स्वच्छ सर्वेक्षण २०१८' मोहिमेचा बारामती शहरात शुभारंभ केला. संपूर्ण देशभरातून हजारो नगरपरिषदा या मोहिमेत सहभागी आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ३७६ नगरपरिषदांचाही सहभाग आहे.
कोणतीही मोहीम यशस्वी करायाची असेल तर त्यात विद्यार्थ्यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अनेक योजना त्या कुटुंब आणि समाजापर्यंत वेगाने पोहचवू शकतो हा आमचा आजवरचा अनुभव राहिला आहे. विद्यार्थी हेच खऱ्या अर्थाने स्वच्छतेचे दूत आहेत. त्यांचा सक्रिय सहभाग असल्याने हे अभियान नक्की यशस्वी होईल.
बारामती शहरातील अनेक शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी सर्व विद्यार्थी आणि बारामतीकरांनी स्वच्छतेची शपथ घेतली. या प्रसंगी बारामती विभागाचे प्रांताधिकारी हेमंत निकम, बारामतीच्या नगराध्यक्षा सौ. पोर्णिमा तावरे यांच्यासह सर्व विद्यमान नगरसेवक, नगर पालिका कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.