श्री निमजाईदेवीचा कलशारोहन समारंभ
*आज श्री निमजाईदेवीचा कलशारोहन समारंभ निंबळक,फलटण या ठिकाणी पार पडला इ.स.1244 पासून अस्तित्वात असलेले हे मंदिर तमाम निंबाळकरांचे कुलदैवत आहे बरोबर 6 वर्षांपूर्वी १० डिसेंबर 2011 रोजी या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे भूमिपूजन आदरणीय दादांच्या शुभहस्ते होणे आणि आज आदरणीय वहिनींच्या शुभहस्ते त्यावरील कळस चढविला जाणे हा निव्वळ योगायोग नसून या राज्याला दिशा देणाऱ्या सर्वाधिक परिपूर्ण दांपत्याला निमजाई देवीने दिलेला आशीर्वाद आहे अशाच भावना उपस्थित सर्वांच्याच होत्या.*
*वहिनींच्या उपस्थितीने आजच्या कार्यक्रमाला नवचैतन्य प्राप्त झाले.वहिनींच्या पुढच्या कार्याला सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.*
*ह.भ.प. प्रकाशजी बोधले महाराज यांनी दिलेल्या शुभेच्छा खूपच अर्थपूर्ण होत्या त्या अशा*
*तेरकर आणि बारामतीकर यांचा जुळला सुरात सूर*
*दादांच्या सहवासात कधीच कुणाला वाटत नाही हुरहूर*
*दादांच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकालाच दादा देतात भरपूर*
*म्हणून बारामतीच आहे विकासाचे खरे पंढरपूर*
*एक सुंदर भक्तिमय सोहळा आदरणीय वहिनींच्या उपस्थितीत पाहता आला याचा मनस्वी आनंद आहे .याप्रसंगी अमर मामाजींनी देखील मनोगत व्यक्त केले.*