दीपज्योती एक प्रकाशपर्व
बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा आदरणीय सौ. सुनेत्रा वहिनी पवार यांचा जीवनप्रवास उलगडणारे आणि त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या सामाजिक कार्याची माहिती त्यांना जवळुन ओळखणा-या आणि त्यांच्यासोबत काम करणा-या विविध मान्यवरांच्या नजरेतुन शब्दांकित केलेले
"दीपज्योती एक प्रकाशपर्व "
या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दि. 12 नोव्हेंबर 2017 रोजी
महाराष्ट्रराज्याचे विरोधी पक्षनेते मा. धनंजय मुंडे यांच्या शुभहास्ते दि.12 नोव्हेंबर 2017 रोजी
सायं. 4.00 वाजता
स्वामी विवेकानंद सभागृह, एम. आय. टी. कॉलेज, कोथरुड, पुणे, येथे संपन्न झाला.
या प्रसंगी
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एम.आय.टी चे सर्वेसर्वा श्री. विश्वनाथ कराड, यशदा चे अधिष्ठाता डॉ भारत भूषण, खासदार वंदना चव्हाण, रजनी इंदुलकर , शर्मिला राज ठाकरे, पुणे अर्बन को. बँकेचे अध्यक्ष निलेश ढमढेरे, विद्या प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष अँड. ए. व्ही.प्रभुणे,सचिव द. रा. उंडे साहेब त्यांचे सर्व सहकारी, टेक्सटाईल पार्कचे सी. ई. ओ. श्री. संकेश्वरकर, त्यांचे सर्व सहकारी,काटेवाडी गावच्या सरपंच गैरी काटे, सर्व काटेवाडी गावचे ग्रामस्थ, पदाधिकारी, फोरम सदस्य, पवार व पाटील कुटुंबिय सदस्य, तसेच या कार्यक्रमासाठी खास पुणे,- मुंबई, बारामती, काटेवाडी येथुन आलेले सर्व मान्यवर आणि मिरॅकल एड फाऊंडेशनचे विशाल हिरेमठ,रुद्रान देशमुख, विविके सुर्यवंशी व वाढदिवस ग्रुपचे निलेश निकम व त्यांचे सर्व सहकारी मोठ्या संख्याेने उपस्थित होते.