Women power

रायरेश्वराच्या साक्षीने स्त्री शक्तीचा जागर.
भोरमधील हजारो महिलांचे प्रेम ऊर्जा देणारे, बळ देणारे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वराच्या साक्षीने उसळलेल्या महिलांच्या विराट शक्तीसोबतची कालची रात्र प्रचंड ऊर्जा, बळ देणारी ठरली.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजितदादा शिवतरे यांनी भोर तालुक्यातील महिलांसाठी आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात स्त्री शक्तीचे झालेले विराट दर्शन पाहून या कार्यक्रमास उपस्थित राहता आले, ही माझ्यासाठी विशेष आनंदाची बाब ठरली.

काल शिवरे, खोपी, वर्वे, किकवी आदी ठिकाणी सदिच्छा भेटींसह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहत भोरमध्ये पोहोचायला रात्र झाली.
मात्र उत्रौली (भोर) येथे पोहोचल्यानंतर तिथे प्रचंड संख्येने उपस्थित असणाऱ्या अफाट जनसमुदायातील महिलांचा उत्साह, प्रेम पाहून मलाही साऱ्या धावपळीचे सार्थक झाल्याचे वाटले.

या कार्यक्रमात माझ्या साऱ्या मैत्रिणींनी ज्या अफाट उत्साहाने सहभाग घेत आपल्यातील कलागुण, हुशारी, समयसूचकता धाडसाने दाखवत होम मिनिस्टर कार्यक्रमाचे स्टेज गाजवलं ते पाहून डोंगरदऱ्यात असणारं हे टॅलेंट अधिक मोठया व्यासपीठावर उजळलं पाहिजे असं वाटलं. त्यातुनच या कर्तबगारीला भक्कम पाठबळ देण्याचा निर्धार करण्यासोबत या कार्यक्रमास मला निमंत्रित केल्याबद्दल रणजितदादा यांना मनापासून धन्यवाद.

यावेळी संतोष घोरपडे, भालचंद्र जगताप, विक्रमदादा खुटवड, पल्लवीताई शिवतरे, चंद्रकांत बाठे, सुनील भेलके, विद्याताई पांगारे, संगिता शेटे, सुवर्णाताई शिवतरे, मोनिका कुंभार, भरत शिवतारे, भगवान शिवतरे यांच्यासह विविध पदाधिकारी, ग्रामस्थ यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

Scroll to Top
Share via
Copy link