आज सकाळी ७ वाजता माझ्या काटेवाडी गावातील मतदान केंद्रावर माझ्या सासूबाई म्हणजेच आई श्रीमती आशाताई पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला. आता पुढचा प्रवास असेल तो तमाम जनतेच्या हक्कासाठी जागरूक राहण्याचा. आजपर्यंत लाभलेली तुमच्या सर्वांची सोबत, प्रेम, आशिर्वाद या पुढच्याही प्रवासात कायम राहुद्या, या अपेक्षेसह आपण सर्वांनी आपल्या उज्वल भवितव्यासाठी, या देशाच्या प्रगतीसाठी आवर्जून मतदानाचा हक्क बजावावा ही नम्र विनंती.
Share via: