उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून साकारणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी अवघ्या काही दिवसांपूर्वी डोर्लेवाडी येथे जाणं झालं होतं. त्यानंतर आज पुन्हा तुकाराम बीज निमित्त जाणं झालं.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा डोर्लेवाडीतील मंदिरात साजरा होत असलेला हा 64 वा सोहळा आहे. या सोहळ्यासाठी हजारो भाविक वारकरी डोर्लेवाडीत दाखल झाले आहेत. भक्तीने भारलेल्या या मंगलमय वातावरणात सहभागी होऊन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. मंदिरापर्यंत पायी चालत जाताना भेटायला जमलेल्या गर्दीमुळे ती छोटीशी वाट पार करण्यास बराच वेळ लागला.
विशेषत: महिला, तरुणी माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी, सेल्फी घेण्यासाठी करत असलेला आग्रह मोडता येत नव्हता. या प्रेमात न्हावून जात मंदिरात पोहोचले.
दर्शन झाल्यानंतर मंदिर व्यवस्थापन समिती आणि डोर्लेवाडी ग्रामस्थांनी स्वागत केले, सन्मान केला. तुकाराम महाराजांचा आशीर्वाद सत्कार रूपाने मला दिला. त्याबद्दल या सर्वांचे मनापासून आभार.
Share via: