Victory of Maha Yuti was roaring

जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त आणि फक्त जनसागराची उसळलेली लाट. या लाटांमधून गर्जना होत होती ती महायुतीच्या महाविजयाच्या निर्धाराची. अफाट जनसागराच्या पाठिंब्याने भारलेल्या या वातावरणात चैतन्य निर्माण केले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. पंतप्रधान मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुण्यातील रेसकोर्स मैदानावर महायुतीची अतिविराट जाहीर सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या अनेक मान्यवर नेत्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना मोदीजींनी देशाच्या वाटचालीचा आढावा घेऊन, माझ्यासह महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
माझ्या भाषणात मी सांगितले की, मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होताना संसदेत त्यांच्या पाठीशी बारामती लोकसभा मतदार संघातील जनतेच्या शुभेच्छा, पाठबळ सोबत असतील.
या सभेसाठी पुणे, शिरूर, मावळसह बारामती लोकसभा मतदार संघातील जनतेनेही प्रचंड संख्येने उपस्थिती दर्शवली. त्याबद्दल तमाम जनतेसह पंतप्रधान मोदीजी व सर्व नेत्यांचे मनापासून आभार.
Scroll to Top
Share via
Copy link