इंदापुरमध्ये आज एका अलौकिक व्यक्तिमत्वाची भेट झाली. काहीच दिवसांपूर्वी इंदापूर भूषण पुरस्काराने गौरवप्राप्त झालेलं हे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीमती प्रतिभा प्रभाकर गारटकर.
३५ वर्ष शिक्षिका या नात्याने त्यांनी ज्ञानदान केलं. ते करताना सातत्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासाचा ध्यास घेतला. एक लेखिका, कवियत्री म्हणून त्यांनी सरस्वतीची पूजा केली.
त्यांचे पती स्व. प्रभाकर गारटकर उर्फ तात्या एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र त्यापेक्षाही त्यांची महत्वपूर्ण ओळख म्हणजे ते गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक होते, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील आघाडीचे शिलेदार होते. १९६२ साली जिल्हा होमगार्डचे जिल्हा समादेशक म्हणून काम करताना त्यांनी प्रतिभा गारटकर यांना होमगार्डमध्ये भरती व्हायला लावलं. त्या अर्थाने त्या पहिल्या महिला होमगार्ड असून त्यांच्याच प्रेरणेने महिला होमगार्ड युनिट सुरू झाले.
अशा कितीतरी गोष्टी त्यांच्याबाबत सांगण्यासारख्या आहेत. वयाच्या ८५ वर्षानंतर त्या अत्यंत कृतार्थतेचे, तृप्तीचे जीवन जगत पुढील पिढीला मार्गदर्शन करीत समाधानाचे जीवन जगत आहेत. अशा समाधानी कर्तबगार थोर व्यक्तिमत्वाची भेट समृद्ध करणारी, त्यांचे आशीर्वाद बळ देणारे आहेत हे नक्की. यावेळी संपूर्ण गारटकर कुटुंबीयांनी केलेले आदरातिथ्य, स्वागत सदैव लक्षात राहील असेच.
Share via: