क्रांतिज्योत महिला प्रतिष्ठानच्या वतीने खेड शिवापूर येथे आयोजित केलेल्या मेळाव्यास महिलांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
या मेळाव्याला उपस्थित राहिलेल्या महिलांमधील सळसळत्या उत्साहाची उत्स्फूर्त उपस्थिती खूप भावली. त्याचसोबत या सर्वजनींमधे असणारा प्रचंड आत्मविश्वास या सिंहगडाच्या कुशीत पायथ्याला, राहणाऱ्या वाघिणी आहेत हे सिद्ध करत होता.
या निमित्ताने पार पडलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात देखील माझ्या या मैत्रिणींनी चांगलीच धमाल केली.
त्यांची अशी भेट आता पुन्हा पुन्हा होत राहील हे नक्की.
Share via: