क्रांतिवीरांची भूमी आणि कार्यकर्त्यांचे मोहोळ असणाऱ्या पणदरे गावात महायुतीच्या विक्रमी विजयाचा निर्धार करण्यात आला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेले ग्रामस्थ, पदाधिकारी या सर्वांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून पणदरे गावाचा झालेला कायापालट सांगून सारे गाव एकजुटीने महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे असल्याचे सांगितले.
यावेळी संभाजी होळकर, ॲड. केशवबापू जगताप, योगेश जगताप, मदनराव देवकाते, सचिन सातव, पोपटराव गावडे, राजेंद्र जगताप, महादेव कोकरे, कुलभूषण कोकरे, अजित सोनवणे, मनोज जगताप, प्रशांत काटे, अविबापू गोफने, नितीन शेंडे, तानाजी कोकरे, मंगेश जगताप, स्वप्नील जगताप, सुनील पवार, यांच्यासह विविध पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पणदरे ग्रामस्थांनी पुन्हा स्वागत केले, सन्मान केला. पुन्हा एकदा विजयाची ग्वाही दिली. त्याबद्दल या सर्वांचे मनापासून आभार
Share via: