एकेक धागा विणत सुंदर वस्त्र विणणार्या कोष्टी समाजाने काळाच्या ओघात नवनवी क्षेत्रं पादाक्रांत केली आहेत. काळाच्या ओघात बदलत नवनवी आव्हाने पेलणार्या या समाजाने काल बारामतीत आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात मला बोलावलं. माझा सन्मान केला. सोबत असल्याची ग्वाही देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यांनी दाखवलेल्या या अपुर्वातून त्यांच्याशी असणार्या स्नेहाच्या धाग्याची वीण अधिकच घट्ट झाली.
काल पहाटे पुण्यात पोहोचून सकाळी तिथले कार्यक्रम पार पाडले. त्यानंतर धावपळ करुन बारामतीत पोहोचले आणि या स्नेहमेळाव्यास उपस्थित राहिले. विशेष म्हणजे या मेळाव्यासाठी कोष्टी बांधवांनी केवळ बारामतीतीलच नव्हे तर इतर ठिकाणच्याही समाजबांधवांना, समाजाच्या नेत्यांना आमंत्रित केले होते. त्यामध्ये विशेषत: समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुणराव वरुडे, उत्तमराव म्हेत्रे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती अॅड. भास्करराव गुंडगे, समाजाचे अध्यक्ष नितीन दिवटे, केव्हीटीचे संस्थापक सचिन टकले, रमेश भंडारे, उत्तमराव म्हेत्रे आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतात शुभेच्छा देऊन समाजाच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून झालेल्या कामांची माहिती किरण गुजर यांनी दिली.
आजच्या मोबाईलच्या जमान्यातही संवादसेतू म्हणून कार्यरत असणार्या गोकुळ नवले यांचा सन्मान माझ्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना मी स्नेहाच्या धाग्याची वीण घट्ट केल्याबद्दल सर्व समाजबांधवांचे आभार मानून बारामती हाय टेक टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून या समााजाच्या वेगळया नात्याने जोडले गेल्याचे सांगून यापुढील काळात या समाजाच्या अधिकाधिक विकासासाठी कटीबद्ध असल्याचा शब्द दिला.
Share via: