स्ट्रॉंग गर्ल सईची
दिमाखदार कामगिरी..!
काल पुण्यात दुग्गड ग्रुप व निर्झर ग्रुपच्या वतीने पार पडलेल्या महारक्तदान शिबिरात सामाजिक सेवेचा महायज्ञ पाहिला. दुग्गड यांच्या सामाजिक कामाची यादी आणि व्याप्ती खूपच मोठी आहे. या सामाजिक तळमळीच्या कामांसोबत एका सावित्रीच्या लेकीला त्यांच्याकडून मिळालेले बळ खूपच भावले.
सई विनायक डावकर ही मुलगी बॉक्सिंगमध्ये करिअर करु पाहत आहे. तिच्या या प्रयत्नांना बळ देण्याचे काम करत दुग्गड परिवाराने तिला ‘लाख’मोलाची मदत केली आहे.
स्ट्रॉंग गर्ल असणाऱ्या सईनेही हा विश्वास सार्थ ठरवत बॉक्सिंगमध्ये राज्य, राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धा जिंकायला सुरुवात केली आहे. तिच्या याच यशाबद्दल कालच्या कार्यक्रमात सईचा माझ्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी सईला भेट देण्यात आलेल्या बॉक्सिंग किट मधील ग्लोव्हज सई व दुग्गड परिवाराने माझ्याही हातात घातले. सईने व मी परस्परांना हात भिडवला तेव्हा सईच्या चेहऱ्यावर पुढील दिमाखदार कामगिरीसाठी सज्ज असल्याचा विश्वास झळालला.
या निमित्ताने एक आवर्जून सांगावेसे वाटते, की दुग्गड परिवारासोबत त्यांच्या नव्या पिढीतील तरुणांनी देखील चालवलेले हा सामाजिक कार्य राष्ट्र कार्य आहे. त्या कार्यास मनापासून शुभेच्छा.
Share via: