आज सकाळी बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस भवन अफाट संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीने तुडुंब भरले होते.
राष्ट्रवादीच्या नव्या पर्वात वेगवान आणि दमदारपणे वाटचाल सुरू आहे. त्या वाटचालीला बळकटी देण्याचे काम नूतन पदाधिकारी अधिक शक्तीने करतील याची खात्री आहे. याच खात्रीतून नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली. ही नवी जबाबदारी गांभीर्याने आणि यशस्वीपणे पेलण्यासाठी सर्व नूतन पदाधीकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेससह विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Share via: