गुढीपाडव्या दिवशी पाठिंब्याची गुढी उभारून राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला भक्कम पाठबळ दिले. त्यानंतर मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात माझ्या प्रचारात सक्रिय सहभागी होऊन आज जिल्ह्यातील प्रमुख मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियोजनाची बैठक आयोजित केली. या बैठकीला मलाही निमंत्रित करून कोणत्याही अटी शर्थी शिवाय बारामती लोकसभा मतदारसंघात भक्कमपणे सोबत असल्याची ग्वाही दिली.
वास्तविक राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला माझ्या जवळच्या मैत्रीन. त्या मैत्रीत आजपर्यंत राजकीय भूमिकांचा कधीच अडसर आला नव्हता. ते नाते जपताना दाखवण्यात येणारा उमदेपणा देशहितासाठी महायुतीला पाठिंबा देऊन राज ठाकरे यांनी दाखवला आहे. त्याचा संदर्भ मनसे पदाधिकाऱ्यांनीच या नियोजन बैठकीत दिला.
यावेळी मनसेचे नेते दिलीप धोत्रे, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुधीर पाटसकर, जिल्हाध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी, मनसेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रतिभा डेंगळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकर भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा वैष्णवी कोकरे, कैलास दांगट, गिरीश वाबळे, संतोष भिसे, प्रदीप रकटे, प्रशांत पवार, मल्हारी लोखंडे, ऋषिकेश भोसले, प्रवीण धनराळे, भार्गव पाटसकर, अमोल गालींदे, प्रशांत फडदरे, शुभम बर्डे, सचिन कुलते यांच्यासह जिल्हा परिषद आलेले मनसेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
बारामती लोकसभा मतदारसंघात “घड्याळ” चिन्हालाच मतदान होऊन महायुतीचा विक्रमी मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास व्यक्त करत मनसैनिकांनी सर्वांचीच मने जिंकली. त्यांनी दिलेल्या विनाशर्थ पाठिंब्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
Share via: