भोर तालुक्यातील आजच्या दौऱ्याची सांगता झाली ती श्री स्वामी समर्थांच्या भक्तिरसात तल्लीन झालेल्या जनसागरासोबत घेतलेल्या स्वामींच्या दर्शनाने. भोरमधील संजयनगर येथे रायरीकर कुटुंबीय व स्वामी भक्तांनी 2007 साली श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. तेव्हा सुरू झालेला स्वामी भक्तीचा यज्ञ आता महायज्ञ झाला आहे. याच महायज्ञात श्री स्वामी समर्थांच्या आजच्या प्रकटदिनी मीही माझ्या भक्तीची समिधा अर्पण केली.
आज सर्वत्र श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन अत्यंत भक्तीभावाने साजरा होत असताना भोरमध्ये स्वामीभक्तीने भारलेल्या अलौकिक वातावरणात मलाही स्वामींच्या दर्शनाचा लाभ झाला. या ठिकाणी श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात सद्गुरू शंकर महाराज, महारुद्र हनुमान, महागणपती, नागदेवता आणि साडेतीन शक्तीपीठातील आई तुळजाभवानी, अंबाबाई, रेणुका माता, सप्तशृंगी यांच्याही मूर्ती विराजमान आहेत. पंचसूत्र औदुंबर दत्तपीठ असणाऱ्या या ठिकाणी लवकरच दत्त महाराज आणि नवनाथ मूर्तीची स्थापना होणार आहे.
अन्नदान, आरोग्य शिबिरे असे विविध उपक्रम इथे राबवले जातात. आज स्वामींच्या प्रकट दिनी सुमारे 30 हजार भक्तांनी येथे दर्शनाचा, महाप्रसादाचा लाभ घेतला. अनेक स्वामी भक्त स्वयंसेवकांमुळे एवढी गर्दी असूनही काटेकोर शिस्तीचे दर्शन झाले. ते विशेष भावले.
या ठिकाणी मयूर रायरीकर, मुकुंद रायरीकर, अवधूत रायरीकर यांनी स्वागत केले. सन्मान केला. श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद सत्कार रूपाने दिला. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
यावेळी रणजीत शिवतरे, भालचंद्र जगताप, केदार देशपांडे, कुणाल धुमाळ, अतुल काकडे, सनी साळुंखे, शंकर भिलारे, सचिन मांडके, स्वाती गांधी, राजा गुरव, पंकज खुर्द, नितीन आप्पा सोनवले, सोमनाथ ढवळे, पोपट तारू, सुरेश वालगुडे, सुरेश साळुंखे, रवी गायकवाड, भिकुले काका, सागर वालगुडे, विशाल तुगुतकर, ऋषी गायकवाड, लोकेश घोणे, तेजस मोरे, ऋषिकेश कारळे, प्रशांत पवार, सचिन चोरगे यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी स्वामीभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने लाभलेले आत्मिक समाधान ऊर्जा देणारे असते. तीच ऊर्जा आज मिळाली.
Share via: