इंदापूरचे ग्रामदैवत म्हणजे जागृत श्री इंद्रेश्वर. या मंदिरात सध्या परवा होणाऱ्या महाशिवरात्र निमित्त मोठा उत्सव सुरू आहे. आज या मंदिरात जाऊन उत्सवात सहभागी होण्यासोबत महाआरती करण्याचे भाग्य लाभले.
अलोट भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत भारलेल्या वातावरणात संपन्न झालेल्या या महाआरतीने मनाला प्रचंड शांती, समाधान लाभलेच शिवाय एक ताकदवान उर्जा मिळाली. ती ऊर्जा अधिक ताकदीने जनसेवेसाठी खर्च करेन. तेवढा विश्वास चंद्रेश्वराच्या आशीर्वादाने प्राप्त झाला आहे.
यावेळी देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी स्वागत, सन्मान केला त्याबद्दल त्यांचे आभार.
Share via: