Mother’s name along with father

“वडिलांसोबत आईचेही नाव

या निर्णयाचे समाधान अंमलबजावणीचा अभिमान “
यापुढे नाव लिहिताना वडिलांआधी आता आईचेही नाव लिहिणं बंधनकारक करण्याचा निर्णय झाला आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्याची जाहीर अंमलबजावणी त्वरीत सर्वप्रथम केली.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री दालनाच्या दरवाजावर आता ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ असा नामफलक लावण्यात आला असून या निर्णयाने स्त्री पुरुष समानतेची चळवळ एक पाऊल पुढे गेली आहे.

या निर्णयाचे मला विशेष समाधान का? तर महिला सक्षमीकरण चळवळीत काम करताना महिलांच्या सन्मानासाठी मी केलेल्या कामातील हा एक महत्वपूर्ण टप्पा मला वाटतो.

बारामती तालुक्यातील काटेवाडी या आमच्या गावात आम्ही पूर्वीच घराच्या दरवाजावर आणि मालमत्तेत घरमालकासोबत त्याच्या घरमालकिणीचेही नाव लावण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी केली आहे.

२३ वर्षांपूर्वी जेव्हा मी हा प्रस्ताव माझ्या गावकऱ्यांसमोर मांडला, तेव्हा त्यांनी मोठया मनाने त्याला मान्यता दिली होती. त्यांनी तेव्हा दिलेली ती मान्यता काळाच्या पुढचे पाऊल कसे ठरले, हे राज्य पातळीवरील निर्णयाने सिद्ध झाले आहे. त्यामुळे काटेवाडीच्या ‘माझ्या’ माणसांबद्दलचा अभिमान उंचावला, स्त्री पुरुष समतेचा आवाज बुलंद केल्याबद्दल राज्य शासनाबद्दल आभाराची भावना व्यक्त झाली.

Scroll to Top
Share via
Copy link