वीरांचा हा वारसा जतन करूया..!
बारामतीतील काशीविश्वेश्वर मंदिर आवारात काही वीरगळ आहेत. बहुतेक गावात विशेषतः मंदिर परिसरात अशा वीरगळ आढळतात. या वीरगळ म्हणजे वीरांच्या स्मरणार्थ तयार केलेले स्तंभ. तीनेक फुटांच्या दगडावर या वीरांच्या स्मृती कोरलेल्या असतात. त्यामधे विरांना स्वर्गप्राप्ती झाल्याचे प्रतीत करून त्यातून वेगवेगळे संदेश दिलेले असतात.
पूर्वी लढाईवर असताना विरगतीला प्राप्त झालेल्या वीरांच्या स्मृतींच्या या वीरगळ महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळतात. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या किकली गावात या वीरगळ जाणीवपूर्वक जपल्या आहेत. त्यातून पहिले विरगळींचे गाव म्हणून किकलीला मान्यता मिळाली आहे. मात्र अजूनही काही ठिकाणी या वीरगळ गांभीर्याने जपल्या जात नाहीत, त्यावर रंग दिलेले आहेत तर काही ठिकाणी त्या अडगळीत आहेत.
या पुढील काळात या विरगळी जतन करून वीरांच्या स्मृती जपण्याची जागरूकता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करूयात.
Share via: