कालच्या इंदापूर दौऱ्याची सांगता बीजवडीतील दिलीपराव भिसे यांच्या निवासस्थानी दिलेल्या सदिच्छा भेटीने झाली.
दिवसभर लाभलेला प्रचंड प्रतिसाद, प्रत्येक ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर ठामपणे व्यक्त झालेला विश्वास, हे भारलेलं वातावरण भिसे यांच्या निवासस्थानी देखील कायम होतं.
यावेळी दिलीपराव भिसे यांचे सुपुत्र मयूर व सौ. उत्कर्षा या काही दिवसांपूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर “सुनेला जपा”, असे मिश्किलपणे दिलीपराव आणि त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या तालुका उपाध्यक्षा सौ. रेश्माताई यांना सांगितले. त्यावर त्यात काही हयगय होणार नाही, असे त्यांनी उत्स्फूर्त हसत सांगितले.
अशा या अत्यंत आनंदी भेटीवेळी नानासाहेब भिसे, सौ. पुष्पा भिसे, सागर भिसे तसेच सारे भिसे कुटुंबिय व त्यांचे स्नेही उपस्थित होते.
Share via: