In the shadow of the love of Jesus

येशूच्या प्रितीच्या सावलीत
ख्रिश्चन बांधवांना दिल्या शुभेच्छा

पाम संडे निमित्त आज सर्व ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा देताना दौंड शहरातील चर्च व इतर संस्थांना सदिच्छा भेटी दिल्या.

दौंड फास्टर फेलोशिपच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले, तसेच हॉस्पिटलच्या मैदानावर झालेल्या भव्य शोभायात्रेच्या सांगता सोहळ्याला उपस्थित राहून या सर्वांच्या आनंदात सहभागी होता आलं, याचा मलाही आनंद वाटला. यावेळी फास्टर बेंजेमिन तिवारी, रतन जाधव, राजन जाधव, विनोद जाधव आणि सर्व बांधवांनी केलेल्या स्वागताबद्दल त्यांचे मनापासून आभार.

यानंतर सेंट सेबेस्टियन चर्च आणि स्कूल येथेही भेट दिली. सेंट सेबेस्टियन स्कूल एक अत्यंत दर्जेदार शैक्षणिक केंद्र म्हणून खूपच प्रसिद्ध आहे. या शाळेचा दर्जा नेहमीच गौरवला जातो. अशा या गौरवास्पद ठिकाणी फादर लुईस यांनी अत्यंत प्रेमपूर्वक आम्हा सर्वांचे स्वागत केले. पाम संडेच्या दिलेल्या शुभेच्छांचा त्यांनी आनंदाने स्वीकार केला. मला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दौंड शहरातील सर्वच ख्रिस्ती बांधवांनी आपुलकीने केलेल्या या स्वागताबद्दल, दिलेल्या शुभेच्छांबद्दल त्यांचे मनापासून आभार.

यावेळी माजी आमदार रमेश आप्पा थोरात, वैशालीताई नागवडे, वीरधवलबाबा जगदाळे, गुरुमुख नारंग, राजेश जाधव, वसीम शेख, जीवराज पवार, प्रशांत धनवे, नंदकुमार पवार, नागसेन धेंडे, रोहित पाटील, उत्तमआप्पा आटोळे आदी मान्यवर, विविध सेलचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top
Share via
Copy link