“स्नेहमेळावा झाला निर्धार मेळावा”
कालच्या दिवसातील शेवटचा कार्यक्रम झाला तो माळी समाज बांधवाचा मेळावा.
माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र बनकर यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्याला बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर अशा विविध ठिकाणाहून समाजाचे पदाधिकारी व बारामतीतील बांधव प्रचंड संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना विविध वक्त्यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजितदाद पवार यांच्या माध्यमातून विकासकामांची माहिती दिली. विकासकामे साकारताना आलेले अनुभव सांगितले. दादांची तडफ, जनतेप्रती आपुलकी, प्रेम याबद्दल सांगताना, दुष्मनी करणार्यांचाही कधी द्वेष न बाळगणार्या अजितदादांच्या पाठिशी सोबत असल्याची ग्वाही दिली. या वाक्याने मला अनेक प्रसंग आठवले. दादांच्या विरोधात भूमिका घेणारेही दादांकडे एखाद्या कामासाठी जेव्हा येतात तेव्हा दादा मदतीचीच भूमिका घेतात. त्यांच्या या अशा स्वभावाची अनेक उदाहरणे या मेळाव्यात सर्वच वक्त्यांनी दिली. त्यामुळे वेगळ्या भारलेल्या वातावरणात पार पडलेला हा प्रचंड गर्दीचा स्नेहमेळावा जणू निर्धार मेळावा झाला. तोच निर्धार व्यक्त करुन माझा सन्मान केल्याबद्दल सर्व समाजबांधवांचे त्यांच्या नेत्यांचे, पदाधिकार्यांचे मनापासून आभार.
Share via: