Elgar for Ajit Dada

सर्व जाती-धर्म, गट – तटाच्या भिंती कोसळून एकवटलेल्या पणदरे ग्रामस्थांनी आज सकाळी ज्या पद्धतीने अफाट गर्दीने स्वागत केले, भव्य पदयात्रा काढली, बारामती लोकसभा मतदारसंघातील पहील्या कार्यालयाचे उदघाटन केले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ‘आम्ही सगळे अजितदादा’ म्हणत ज्या अलोट प्रेमाचा वर्षाव केला ते पाहून निशब्द झाले.

स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा लाभल्याने क्रांतिकारी भूमी ठरलेल्या पणदरेतील प्रत्येकाच्या रोमारोमात लढाऊ वृत्ती आहे. हीच लढाऊ वृत्ती प्रत्येकाच्या रक्ताच्या थेंबाथेंबात आहे. त्याच साऱ्या धमन्यांतील क्रांतिकारी रक्त उसळून साऱ्या मनगटांनी अजितदादांसाठी एल्गार केल्याचे, दादांच्या पाठींशी सारेजण एकवटल्याचे दिसले. त्याच साऱ्या हातांनी मलाही भरभरून आशीर्वाद दिले. त्याने मी अगदी भरून पावले.

इथं आल्यानंतर विविध मंदिरांसह, जैन मंदिरात, दर्ग्यात जाऊन दर्शन घेतलंच शिवाय स्वातंत्र्य सैनिक भगवानराव मदने यांच्या पुतळ्यालाही अभिवादन केले.
याचवेळी वृक्षारोपण करून नवं बीज रोवलं आणि स्टेटस फोटोजचे उदघाटन करून नवउद्योगाला शुभेच्छा दिल्या.

पणदरे गावात नेहमी येणं होतं. त्या अर्थाने या गावशी माझे जुने नाते आहे. तेच नातं पणदरेकरांनी आज घट्ट केलं.

एवढंच नाही, तर गर्दीतून एक आवाज घुमला. तो आवाज गरजला, वहिनी आजपर्यंत तूम्ही नेहमी इतरांसाठी मताचे दान मागितलं. आता तुम्ही जनतेच्या उमेदवार असून तुम्हाला न मागता मतं देऊ, १९९१ च्या इतिहासाची दुप्पट ताकदीने पुनरावृत्ती करू.
या उत्फुर्ततेवर काय बोलू? वास्तविक मी सध्या राष्ट्रवादी पक्ष, अजितदादांना बळ द्या, एवढेच नम्र आवाहन करत आहे.

तरीदेखील आधीच पणदरे ग्रामस्थांनी दिलेल्या सदिच्छा मी आशीर्वाद मानते.
या प्रेमाच्या, आशीर्वादाच्या वर्षावात न्हाऊ घालत जेष्ठ नेते ऍड. केशवरावबापू जगताप, योगेश जगताप यांनी मनोगत व्यक्त करून दिलेल्या पाठबळाबद्दल, सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक, महिलांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.

Scroll to Top
Share via
Copy link