दत्त नामाचा महिमा त्रिखंडात आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराजांचे रूप नेहमीच मनाला शितलता, शांतता आणि ऊर्जा देते. याच भावनांचा प्रत्यय वारजे येथील दत्तभक्त संजय वाल्हेकर यांच्या सदिच्छा भेटीने आला.
गुरुदेव दत्त महाराजांचे चरणी लीन होऊन आपल्या भक्तीचा जागर, गजर करणाऱ्या वाल्हेकर यांच्यासह त्यांच्या सर्व आप्तेष्ट, मित्र परिवार, गुरुरायांचे भक्तगण यांच्याशी झालेली ही सदिच्छा भेट कृतार्थ करणारी, दत्त नामाचा महिमा जागवणारी होती.
यावेळी त्यांनी माझा दत्त महाराजांचा आशीर्वादरुपी सन्मान केला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
Share via: