A vibrant and enthusiastic gathering of NCP leaders and workers marked today in Indapur

आज सकाळपासून इंदापूर दौऱ्यात प्रचंड संख्येने आणि तेवढ्याच उत्साहाने राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

पक्षीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भरभरून दिलेल्या विकासकामांची माहिती दिली.

यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. विविध कार्यकर्ता बैठकीत मी उत्स्फूर्तपणे माझे मनोगत व्यक्त केले. उगाच बढाया न मारता वास्तव असेल तेच बोलले. त्यावर अनेकांनी, तुम्ही खूप चांगलं बोलताय, अशी प्रतिक्रिया दिली. त्यावर मी देखील विनोदाने, अजून खूप शंका दूर होणारेत बघूया, असे म्हटल्यावर सर्वांनी त्याला चांगलीच दाद दिली.

यावेळी सारीकाताई भरणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंत कोकाटे, महिला अध्यक्षा साधनाताई केकान, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, उमाताई इंगवले, युवक अध्यक्ष ऍड. शुभम निंबाळकर, प्रतापआबा पाटील, डी. एम. जगताप, श्रीमंत ढोले, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकाळ, अंबादास लांडगे, अतुल झगडे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. कारकर्त्यांचे जणू मोहोळ उठलेल्या या प्रचंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार.

Scroll to Top
Share via
Copy link